शिवाजी महाराजांचा जन्म इंग्लिश कॅलेंडर नुसार १९ फेब्रुवारी १६३० ला झाला शके १५५१, फाल्गुन वद्य ३ ला.
शिवाजी महाराज जयंतीच महत्व आणि गांभीर्य कळायला आपण त्याला ४ टप्प्यात बघायला हव. १. शिवाजी महाराज जन्मायला येण्या आधीचा काळ . २. शिवाजी महाराज जन्माला आले तेव्हाची परिथिती ३. शिवाजी महाराजांचं कार्य ४. आणि त्या कार्याचे परिणाम.
शिवाजी महाराज जन्मायला येण्या आधीचा काळ
१३२० पर्यंत खिलजी घराणे नंतर १३४७ पर्यंत तुघलख, १५२६ पर्यंत बहमनी, बिदर ला १५९२ पर्यंत बरीदशाही, वर्हाडला १५७२ पर्यंत इमादशाही, अहमदनगरला १६३३ पर्यंत निजामशाही, विजापूरला आदिलशाही, आणि मघाशी सांगितल्या प्रमाणे उत्तरेत मोगल तर होतेच.
महाराट्रात आणि महाराष्ट्राच्या दक्षिणेला जी हिंदूंची राज्य होती तिला एक एक करून संपण्याचा प्रयत्न या सगळ्या सुलतानांनी केला. विजयनगरचे साम्राज्याशी बहमनी सल्तनतीचे नेहमी युद्ध सुरु असायचे. बहमनी सल्तनतीत इ.स. xxxx मध्ये फूट पडली व तिथें ५ नवीन सुलतान आले. शेवटी इ.स. xxxx मध्ये निजामशाही ने राक्षतागडीच्या युद्धात विजयनगर राज्याचे पूर्ण पारिपत्य केले आणि विजयनगरचे एवढे भव्य साम्राज्य लयास गेले.
जसे दक्षिणेत सुलतानाचे राज्य सुरु होते तसेच युरोप मधून आलेल्या वसाहती पण होत्या. ए.स. १४९७ ला वास्को द गामा ने cape of good hope ला वळसा घातला आणि तो कालिकत (आजचे kozikode) ला पोचला. हळू हळू करत त्यांनी हिंदी महासागराच्या किनाऱ्यावर अनेक वसाहती केल्या. एत्तद्देशीय लोकांचा छळ करणे, धर्मांतर करणे, सण साजरे न करू देणे, मंदिरे पडणे इ. गोष्टी केल्या. पोर्तुगूइसांसारखे आरमार व सामर्थ्य कुठल्याही तेव्हा च्या राजा कडे नव्हते म्हणून त्यांना आळा घालणे फार कठीण कर्म होत. समुद्रात त्यांच्या परवानगीशिवाय जहाज नेणे शक्य नव्हते. पोर्तुगीझांचे परवाने त्याकरिता लागत, त्याला kartaz म्हणत. ज्याचं कडे kartaz नाही त्याचे जहाज जप्त होत असे नाही तर नष्ट होत असे.
शेवटी मोगल आणि आदिलशाहीने मिळून १६३३ ला निजामशाहीच संपविली आणि महाराष्ट्र च्या भागात जास्त करून राज्य सुरु झाले आदिलशाहीचे व थोड्या प्रमाणात मोगलांचा मुलुख पण होता.
शिवाजी महाराज जन्माला आले तेव्हाची परिथिती
एवढं सगळं होत असतांना कुठल्याच माणसाने एत्तद्देशीय लोकांसाठी, त्यांच्या कल्याणासाठी कधी प्रयत्न केल्याचे दिसत नाही. इथल्या हिंदूंच्या रयतेवर संवत नाही असे अत्याचार सुरु होते. धर्म, संस्कृती, कला इतकाच काय तर रोजचं जगणं सगळंच संकटात होतं. या शक्त्यानं विरुद्ध तलवार उपसायला कोणीच तयार नव्हत. जे सुरु होतं ती जगण्याची पद्धत म्हणून जवळ जवळ स्वीकारली गेली होती.
२५ जुलै १६२९ ला जिजाऊ साहबांचे वडील लखुजी जाधवराव त्यांच्या ३ मुलांसह अचलोजी, राघोजी व यशवंतराव यांच्या बरोबर दौलताबाद किल्ल्यावर निजामशाह ला भेटायला गेले, ते निजामशाहीच्या सेवेतच होते. भेट ठरलीच होती पण काही इतर सरदारांनी बादशाह चे कान भरले असावेत. लखुजी जाधवराव आणि त्यांचे पुत्र दरबारात पोचल्यावर अचानक सपासप तलवारी उपसले गेल्या आणि जिजाऊ साहेबांचं महेर कापून काढण्यात आले. शिवाजी महाराज जन्मायच्या जवळ जवळ ७ महिने आधी. मोठ्या मोठ्या सरदारांची हि परिथिती होती तर सामान्य रयतेचे काय हाल होत असतील विचार करा.
असा काळ सुरू असतांना शके १५५१, फाल्गुन वद्य ३ ला, शुक्लनाम संवत्सरात, शुक्रवारी, हस्त नक्षत्रावर, शिशिर ऋतूत, सिंह लग्नावर, कन्या राशीत शिवनेरी गडावर जिजाऊ साहबांच्या उदरी पुत्ररत्न जाहला आणि त्या मुलाचे नाव ठेवण्यात आले शिवाजी.
शिवाजी महाराजांचं कार्य
१९ फेब १६३० लाशिवाजी महाराजांचा जन्म झाला, अवघ्या १८ वर्षांचे असतांना आदिलशाही सरदाराला युद्धात हरवले, १६५६ ला जावळी केली, १६५६ ला रायरी घेतला, १६५६ ला प्रतापगडाचे बांधकाम सुरु केले, १६५७, दंड राजपुरीच्या मोहीम काढली व सिद्दी ला नमवलं, १६५७ ला कल्याणभिवंडी, १६५८ च्या जानेवारीत माहुली किल्ला घेतला, १५५९ ला अफझल सारखा शत्रू मारला आणि पुढच्या १८ दिवसात प्रतापगड ते पन्हाळगड सगळे किल्ले जिंकले, मोगल सरदार वर १६६३ शाईस्ताखानावर अकस्मात छापा घातला. औरंजेबाने रागावून शाईस्ताखानाची ट्रान्सफर बंगाल ला केली. मोगलांचे ठाणे सुरते वर एकदा नाही २द चाल केली (१६६४ आणि १६७०) पुरंदरच्या तहात बरच किल्ले द्यावे लागले पण ते सगळे लवकरच जिंकून घेतले व अजून किती तरी नवीन बांधले व जिंकले. स्वतःचं आरमार बांधलं, व सागरी किल्ले बांधले, सागराची आणि navy चे महत्व जाणणारा हे एकच राजा त्याकाळातला. मी म्हणाऱ्या जंजिरेजर सिद्दी ला आळा घातला. इंग्रज, portuguese अनु इतर परदेशी वसाहतींवर वाचक बसवला. अनेक शतकानंतर महाराट्राला सार्वभौम राजा मिळाला, ६ जून १६७४ शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि शिवाजी महाराज छत्रपती झाले. १६७७ आपल राज्य जिंजी म्हणजे आजचे चेन्नई पर्यंत गेले, १६७८ ला कोप्पळ चा किल्ला घेतला, १६८० खांदेरी आणि उंदेरी ला इंग्रजांचा समुद्रात पराभव केला. एक माणूस किती काम करतो हो? ३० वर्षांची कारकीर्द पण माणूस किती काम करतो? आपल्याला काय गाठायचं यावरून प्रतिकूल परिथितीत पण लक्ष ढळत नाही. म्हणून "निश्चयाचा महामेरू..."असा त्यांचा उल्लेख होतो. गडकोट, समुद्र तर जिंकलेच पण माणसांची मन पण जिंकली. तुम्हा आम्हाला स्वाभिमानाने जगायला शिकवलं. आणि हे सगळं कशा साठी? ना स्वार्थ, ना लोभ, एक माणूस आपलं सगळं आयुष्य जण कल्याणासाठी वेचतो आणि असं काही करून जातो ज्याने पुढचे शाकुनुशतके त्या कर्तृत्वाचे पडसाद या भूमीत, नद्यांमध्ये, समुद्रात, सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यात घूमतात. म्हणून त्याच वर्णनात त्यांचा उल्लेख "श्रीमंत योगी..." म्हणून पण होतो.
एवढेच काय महाराजनची कीर्ती ऐकून उत्तर प्रदेश मधला कवी इतका मंत्र मुग्ध होतो के तो महाराजांना वर काव्यरूपी जडजवाहिरांची उधळण करतो.
आणि त्या कार्याचे परिणाम.
संभाजी महाराजांच्या वधानंतर, राजाराम महाराज जिंजी ला गेले आणि तिथून त्यांनी मोगलांविरुद्ध लढा सुरु ठेवला. इ.स. १७०० मध्ये राजाराम महाराज गेले. आपलं सैन्य लढतंय, ताराराणी होत्याच पण तस नेतृत्व कोणाच नव्हत. तरीही लोक लढत होते. आपला आयुष्य स्वराज्यावर ओवाळून टाकायला मागे पुढे बघत नव्हते. कशा मुळे होत होत हे सगळं? शिवाजी महाराजांनी लोकांच्या मनामनात स्वाभिमान जागा केला होता. प्रत्येक माणसाच्या मनाचे गडकोट केले होते, छातीची तटबंदी आणि भरभक्कम खांद्यांचे बुरुज केले होते.
मराठ्यांनी अटकेपार झेंडे लावले तो याचाच परिणाम आहे, दिल्ली ची सत्ता गुढग्यावर अली तो याचाच परिणाम आहे, १८५७ ला एक फॉर्मल सत्तांतर झाल ते मोगल बादशाह काहून इंग्रजांकडे पण खरा बघायचं झाला तर जो पर्यंत मराठी सत्ता होती तो पर्यंत इंग्रज फार काही करू नव्हते शकले. मराठी माणसाला एक जहागीरदार, वतनदार, इ. गोष्टीं पेक्षा किती तरी पटीने मोठे के ते शिवाजी महाराजांनी.
आपल्या आजच्या जगण्या वागण्यात शिवाजी महाराजांनी जे तेव्हा केल त्याचे परिणाम आहेत, त्याची फळं आपण आजपण उपभोगतो. ते राजकारण असो का समाजकारण किंवा नुसता माझ्या सारखा सामान्य माणसाचं अस्तित्व असो. या सगळ्या गोष्टींवर शिवाजी महाराजांच्या करायचा परिणाम झालेला दिसतो.
शिवाजी महाराजांनी जे केल ते आपण फक्त अनुभवू शकतो, त्याचे वर्णन करणे महा कठीण.
No comments:
Post a Comment