श्री
आणि हे आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी शिवाजी महाराजांनी अजून एक धाडसी बेत आखला, ३०० कि. मी. आत मोगली मुलुखात शिरून त्यांच्या सर्वात श्रीमंत शहरावर धाड घालायचा, "सुरत", ज्याची श्रीमंती जगभर पसरली होती, ज्याची ख्याती जगात "the greatest emporium of the orient and the richest jewel of Mogol" अशी होती. तापी नदी च्या दक्षिण तीरावर आणि सुवाली जे मुख्य बंदर होते त्याच्या २५ km पूर्वेला सुरत शहर वसलं होतं. सुरत ची संपत्ती अगणित होती. फक्त कस्टम ड्युटी मधून येणारं वार्षिक उत्पन्नच तेव्हाचे १२ लाख रुपये होतं. मोगल बादशहाच्या किमॉंश मधला लखलखता मणी म्हणजे सुरत. जगभरात सुरत मधून व्यापार चाले, इथे हिंदू, मुसलमान, पारशी, इंग्लिश, डच, पोर्तुगीस, तुर्की, आर्मेनियन, अरब, यहुदी असे अनेक प्रकारचे व्यापारी राहायचे. तेव्हाचा जगातला सर्वात श्रीमंत व्यापारी ज्याचं नाव विराजी वोरा, ज्याची एकूण मालमत्ता तेव्हाचे ८० लाख रुपये होती, हा पण तिथेच राहायचा. सुरत शहरामध्ये एक किल्ला होता पण किल्ल्याला ना धड तटबंदी होती, ना बुरुज, ना खंदक. सुरत शहराचं रक्षण करणारा किल्ला पण कमकुवत होता आणि सुभेदार पण. सुभेदाराचं नाव होतं इनायत खान!
६ डिसेंबर १६६३ ला शिवाजी महाराज सुरत मोहिमे साठी निघाले, ३१ डिसेंबर १६६३ ला ते त्रमकेश्वरला पोचले आणि ६ January १६६४ ला ते सुरतेला पोचले. शिवाजी महाराजांचं सैन्य १०००० होतं. एवढा मोठं सैन्य सुरतेच्या दिशेनी जात होतं तरी पण मोगल सैन्याला त्याचा बराच काळ थांग पत्ता नव्हता. मोगलांना पहिल्यांदा "काहीतरी बरोबर नाही" असं वाटलं ते म्हणजे जेव्हा हे सैन्य घणदेवी ला म्हणजे सुरतेहून अगदी ५० KM वर येऊन पोचलं. तेव्हा पण त्यांना "हे शिवाजी महाराजांचं" सैन्य आहे हे माहित नव्हतं कारण जेव्हा कोणी विचारपूस करायचं तेव्हा त्यांना हेच सांगितल्या जायचं के "मोगलांचा सरदार आहे आणि १०००० फौज घेऊन अहमदाबादला चालला आहे" असं Volquard Iversen नावाच्या डच अधिकाऱ्याने आपल्या डायरी मध्ये लिहून ठेवलं आहे.
इनायत खानाला हि बातमी इतर लोक येऊन सांगत होते के "कदाचित शिवाजी महाराज यांचंच सैन्य आहे" पण इनायत खान त्याच्या बोलण्याला धुडकावून लावत होता. आणि त्या रात्री शिवाजी महाराज आपल्या सैन्यासह सुरतेच्या अगदी ८ KM वर उधना नावाच्या गावी येऊन पोचले. आणि सुरतेत आता चिंतेचं वातावरण निर्माण झालं, लोकं आपलं जमेल तेवढं सामान घेऊन सुरतेतून बाहेर निघायला लागले, अजूनही ही बातमी नक्की झाली नव्हती के "सैन्य कोणाचं आहे", कारण जेव्हा विचारत होते तेव्हा कळत होतं की महाबत खान नावाच्या मोगल सरदारानी पाठवलं आहे. पाटण ला जे बंड झालं आहे त्याचा बंदोबस्त लावायला!" पण लोकांच्या मनात चलबिचल होतच होती.
पण या अवधीत शहरात एकच गोंधळ उडाला आणि लोकं शहरातून बाहेर पळायला लागली आणि इनायत खान मात्र इतर मोगल अधिकारी आणि श्रीमंत व्यापाऱ्यांसोबत सुरत शहराचं नशीब शिवाजी महाराजांच्या हवाली करून किल्ल्याच्या आश्रयाला गेला.
श्रीमंतांची घरं शिवाजी महाराजांच्या तडाख्यात सापडत होती, भरपूर धन शिवाजी महाराजांना मिळत होतं. मराठी सैन्य जस किल्ल्या जवळ पोचलं तस त्यांनी किल्ल्यावर पण मारा सुरु केला. मोगलांनी किल्ल्यातून गोळ्या झाडून प्रतिकार करण्याचा प्रयत्नं केला पण डच डायरी मध्ये अशी नोंद केली आहे कि "ज्या गोळ्या झाडल्या त्याने शहराचंच नुकसान जास्त झालं"
७ तारखेला शिवाजी महाराज आपल्या डेऱ्यात बसले होते, जड जवाहीर याच्या राशी त्यांच्या समोर लागल्या होत्या तेवढ्यात, इनायत खानाकडून एक वकील शिवाजी महाराजांकडे काही मागण्या घेऊन आला, त्या मागण्या ऐकून शिवाजी महाराज चिडले आणि त्यांनी "तुमचे सुभेदार स्वतः भेटायला का आले नाहीत, ते स्वतः बायकांसारखे लपून बसले आहेत, आणि त्यांच्या अटी ऐकायला आम्ही काय बायका आहोत काय?" असा सवाल केला, त्यावर तो वकील "आम्ही पण बायका नाही आहोत" म्हणत शिवाजी महाराजांवर तलवार उपसून धावला. तेवढ्यात शिवाजी महाराजांच्या एक अंगरक्षकाने आपल्या तलवारीने त्या वकिलाचा हात कापला पण तो वकील शिवाजी महाराजांवर पडला, आणि त्याच्या रक्ताने शिवाजी महाराज आणि त्यांचे कपडे माखून निघाले. शिवाजी महाराज त्यातून सावरण्याच्या आधीच लोकांचा हा समज झाला के शिवाजी महाराजांना या हल्ल्याने दुखापत झाली आणि त्या लोकांनी लोकांची एकच कत्तल करण्यास सुरुवात केली. महाराज सुखरूप असल्याचे कळताच ही कत्तल थांबली.
३ दिवस हि लूट सुरु होती. british आणि dutch यांनी बराच प्रतिकार केला होता, त्यांच्या वखारीचे रक्षण त्यांनी केले होते. पण बाकीचे सुरत शहर शिवाजी महारांच्या तडाख्यात सापडले होते. John L' Escaliot लिहितो के "रात्री दिवस भासावा आणि दिवसा रात्र भासावी असं चित्र सुरत शहराचं झालं होतं." शहरात Reverend Father Ambrose नावाचा एक फ्रेंच मिशनरी रहात होता होता, तो मुळात चांगला होता, गरिबांना बरीच मदत करायचा, इतरांशी प्रेमाने वागायचा, कपटीपणा त्याच्या मनात नव्हता, शिवाजी महाराजांनी त्यांना काही अपाय होणार नाही याची हमी दिली आणि त्यांच्या संरक्षणाची जवाबदारी घेतली आणि त्यांना काही अपाय होऊ दिला नाही.
या प्रसंगाचा उल्लेख करतांना Bernier शिवाजी महाराजांचा उल्लेख "The Holy Shivaji !" असा करतो.John L' Escaliot लिहितो शिवाजी महाराजांना २० ते २५ लाख रुपये मिळाले होते, अनेक हिरे, माणिक, रुबी, emrald, सोनं, चांदी असा बरंच जड जवाहीर त्यांना मिळालं. विराजी वोरा आणि हाजी जाहिद बेग च्या घराला खणत्या लागल्या होत्या आणि भरपुर धन या दोघांच्या घरून मिळाल होत. फक्त वीरजी वोराच्या घरातून त्यांना ५०००० पौंड sterlings मिळाले असं लिहिलं आहे. Gary नावाच्या अधिकाऱ्याने Earl of Marlborough लिहिलेल्या परतात शिवाजी महाराजांना एकूण १ कोटी रुपयाची धनराशी या मोहिमेतून मिळाली असं लिहिलं आहे. इतर पुरावे पण जवळ जवळ एवढाच आकडा सांगतात. ९ तारखेला पहाटे शिवाजी महाराज सैन्यासह सुरतेच्या बाहेर पडले. डचांनी आपला एक भारतीय कारकून याची माहिती काढायला पाठवला. तो एका फकिराचा वेष घेऊन पूर्ण शहरात फिरून आला, शहराच्या बाहेर मराठी सैन्याचा तळ पडला होता. तो तिथे जाऊन आला आणि परत येऊन त्याने सांगितलं कि मराठी सैन्य आता सुरत शहरात नाही आणि त्यांचा तळ शहराच्या बाहेर पडला आहे, त्यांच्या तळात तंबू लागले नाही, तो म्हणतो मी स्वतः शिवाजी महाराजांना झाडाखाली बसलेलं बघितलं, त्यांना ऊन लागू नये म्हणून वर दोन झाडांना फक्त कापड बांधलं होतं. Volquard Iversen लिहितो "With immense booty he took his departure saying 'I have long since wished to pull Aurangzeb's beard and now my wish is fulfilled".
एवढी संपत्ती घेऊन शिवाजी महाराज राजगडावर परत गेले. शाईस्ताखानाने(शाहिस्तेखानाने)म्हणजेच मोगलांनी जे स्वराज्याचे नुकसान केले होते ते शिवाजी महाराजांनी भरून काढले... ते ही मोगलांच्या मुलुखात ३०० KM आत धाड घालून....!
शत्रूच्या मुलुखात धाड घालणे आणि संपत्ती लुटणे हे काही फक्त शिवाजी महाराजांनीच केलं असं नाही. इतिहास वाचला तर असा घडलेलं पदोपदी दिसून येतं. मुहंमद गझनी ने २१ वर्षात भारतावर १७ धाडी घातल्या आणि अगणित संपत्ती लुटली. त्याने तर इथल्या लोकांना गुलाम बनवून नेलं. अल-बिरुनी, लिहितो "Mahmud of Ghazni has completely destroyed the prosperity of India."
औरंगजेबाने १६५७ मध्ये बिदर(बीदर) म्हणजे कुतुबशाहाचे श्रीमंत ठाणे होते ते लुटले आणि १२ लाख रुपये रोख आणि ८ लाख रुपयांचे शस्त्र लुटले.
अलाउद्दीन खिलजी ने देवगिरी ला असं लुटलं के देवगिरी कधीच त्या धक्यातून स्वतः ला सांभाळू शकली नाही.
प्रबळ राज्य उभं करायला प्रबळ संपत्ती लागते. आणि स्वराज्य व्हावे हि तो श्रींचीच इच्छा होती !
No comments:
Post a Comment